सेवाकराच्या वाढीमुळे महागाईत वाढ

budget
नवी दिल्ली : २०१६-१७ आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केला. जेटलींनी आणि पर्यायाने मोदी सरकारने ‘शेतकरीविरोधी आणि सूट-बुटातील सरकार’ असा आरोप पुसण्याचा प्रयत्न केल्याचे यंदाच्या बजेटमध्ये दिसून आले. मात्र सेवाकरात केलेल्या वाढीमुळे महागाई भडकणार आहे एवढे निश्चित.

काय काय महागणार?
– सोन्या चांदीचे दागिने महागणार
– हिऱ्याचे दागिने महागणार
– लक्झरी कार, ब्रँडेड कपडे महागणार,
– बिडी सोडून इतर तंबाखूजन्य पदार्थ
– सिगरेटही होणार महाग
– दगडी कोळसा
– लेदर बूट, चपलाही महागणार
– दहा लाखापेक्षा अधिक किंमतीच्या गाडया महागल्या.
– सोन्यावरील आयात शुल्क वाढवणार
– डीझेल गाडयांवर अडीच टक्के आणि पेट्रोल गाडयांवर एक टक्का सेस.

काय काय झाले स्वस्त?
कुकींग स्टोव्ह, गोबर गॅस, सॅनिटरी पॅड्स, इंटरनेट मॉडेम्स, सेट टॉप बॉक्स, सीसीटीव्ही कॅमेरे, न्यूज प्रिंट, सोलर दिवे,

Leave a Comment