तुमच्याकडे हे फोन असतील तर बंद होईल व्हॉटस्अ‍ॅप !

whatsapp
मुंबई – जर का तुम्ही नोकिया, विंडोज आणि ब्लॅकबेरीचे जुने फोन वापरत असला तर तुम्हाला व्हॉटस्अ‍ॅपला मुकावे लागणार आहे. कारण या मोबाईलसाठी व्हॉटस्अ‍ॅप सुविधा बंद करण्याचा निर्णय व्हॉटस्अ‍ॅपने घेतला आहे. व्हॉटसअ‍ॅपला या आठवड्यात सात वर्षं पूर्ण होताहेत. या पार्श्वभूमीवर व्हॉटसअ‍ॅपने मॅसेजिंगची सुविधा नोकिया,ब्लॅकबेरी,विंडोजच्या फोनसाठी बंद करण्याचे ठरवले आहे.

कंपनीच्या म्हणण्यानुसार,जेव्हा व्हॉटसअ‍ॅपची सुविधा सुरू करण्यात आली, तेव्हा ब्लॅकबेरी आणि नोकियाच्या मोबाईलची ७० टक्के विक्री झाली होती. आणि आता गुगल,अँड्रॉईड आणि अ‍ॅपल मोबाईलची ९९.५ टक्के विक्री झाली आहे. मार्केटमध्ये आताचा वाटा पाहता जुन्या फोनपेक्षा नव्या मोबाईल फोनचा बोलबोला जास्त आहे. त्यामुळेच युजर्सना अपडेटेड ठेवण्यासाठी आणि मोबाईलच्या सुरक्षेसाठी हा बदल करण्यात येणार आहे असे व्हॉटस्अ‍ॅपने ठरवले आहे.

व्हॉटस्अ‍ॅप आता २०१६ च्या अखेरीपर्यंत ब्लॅकबेरी, ब्लॅकबेरी १०, नोकिया एस४०,नोकिया सिम्बिंअन एस ६० अशा जुन्या फोन आणि अँड्रॉईड २.१,२.२ आणि विंडोज ७.१ या सिस्टीमसाठी व्हॉटस्अ‍ॅप आपली सुविधा बंद करणार आहे.व्हॉटसअ‍ॅपच्या म्हणण्यानुसार, ही सर्व आऊटडेटेड वर्जन्स व्हॉटसअ‍ॅपला भविष्यात सपोर्ट करणार नाहीत आणि त्यांची तेवढी क्षमताही नसेल. म्हणून ग्राहकांनी नवीन अपडेटेड वर्जन्स डाऊनलोड करावं असं आवाहनही व्हॉटस्अ‍ॅपने केले.

Leave a Comment