गुगलचे भरतनाट्यम नृत्यंगणा रुक्मिणी देवी अरुंडले यांना ‘डुडल’ अभिवादन

google
नवी दल्ली – गुगलने ‘डुडल’द्वारे प्रसिद्ध भारतीय भरतनाट्यम नृत्यंगणा रुक्मिणी देवी अरुंडले यांना अभिवादन केले आहे. आज रुक्मिणी देवी यांची ११२ वी जंयती आहे.

रुक्मिणी देवी यांचा जन्म तामिळनाडूतील मदूराई येथे २९ फेब्रुवारी १९०४ मध्ये ब्राह्मण कुटुंबात झाला. भरतनाट्यम या नृत्य प्रकारात रुक्मिणी देवी यांनी लौकिकता प्राप्त केली. रुक्मिणी देवी यांनी भरतनाट्यम या नृत्य प्रकाराला १९२० च्या दशकात विशेष महत्त्व मिळवून दिले. शिवाय भक्तीभावाने नृत्याच्या परंपरा सुरू केली. त्यांच्या कलेचा आदर करत सरकारने त्यांना पद्म भूषण देऊन सन्मानित केले. रुक्मिणी देवी यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. लाकांच्या प्रचंड विरोधानंतरही त्यांनी आपली कला जीवंत ठेवली. शिवाय त्या कलेला महत्त्व मिळवून दिले. त्यांना १९५२ आणि १९५६ ला दोनवेळेस राज्यसभेवर घेण्यात आले. मोरारजी देसाई यांनी रुक्मिणी देवी यांना राष्ट्रपती पदासाठी संधी दिली होती. मात्र त्यांनी आपल्या कलेला अधिक महत्त्व देत त्यांनी ते पद नाकारले.

Leave a Comment