मानसिक तणावावरून रोगाचे निदान

tension
सध्याच्या युगामध्ये मानसिक ताणतणाव वाढत चालले आहेत आणि या तणावाचे रूपांतर शेवटी काही मनोकायिक विकारामध्ये आणि अंतिमतः हृदयरोगामध्ये होत असते हेही लोकांना समजून चुकले आहे. परंतु तणावाचा आणि मानसिक आरोग्याचा त्याचबरोबर संबंधित विकारांचा अभ्यास करणार्‍या तज्ञांनी याचा अधिक खोलात जाऊन विचार केला आहे. त्यांच्या विचारातून आणि पाहणीतून असे आढळून आले आहे की तणावामुळे हृदयरोग होतो असे नाही तर तणावग्रस्त व्यक्ती तणावाचा सामना कसा करते यावर हृदयरोग अवलंबून असतो. अमेरिकेतील काही तज्ञांनी ९०९ व्यक्तींच्या सातत्याने मुलाखती घेऊन हा निष्कर्ष काढला आहे.

मानसिक तणावाखाली जगणार्‍या सर्वांनाच हृदयरोग होतो असे नाही. मात्र जे लोक तणाव जास्त काळ वहन करतात आणि तणावातून लवकर मुक्त होत नाहीत त्यांनाच जास्त करून हृदयरोग होतो. आपल्या जीवनामध्ये तणाव निर्माण होणारी एखादी घटना घडते तेव्हा तिचे विश्‍लेषण करून आपल्या मनाशीच तिचे उत्तर तयार करण्याची सवय ज्यांना असते त्यांच्या मनात फार वेळ तणाव राहत नाही. म्हणजे तणाव हे हृदयरोगाचे कारण नसून तणावाकडे बघण्याचा दृष्टीकोन हे कारण आहे. तणावाकडेसुध्दा सकारात्मक दृष्टीनेसुध्दा बघता येते जे ज्यांना कळते ते तणावावरून हृदयरोगांना बळी पडत नाहीत. म्हणजे एकंदरीत तणावातून हृदयरोग होणे हे जीवनाकडे बघण्याच्या दृष्टीकोनावर अवलंबून आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment