‘ब्लू’ने लाँच केला लाईफ मार्क स्मार्टफोन

blu
नवी दिल्ली – अमेरिकेच्या मोबाईल उत्पादक कंपनी ‘ब्लू’ने आपला लाईफ मार्क हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतरवला असून या फोनची किंमत ८,९९९ रुपये एवढी आहे. या फोनमध्ये ५ इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला असून,अँड्रॉईड ५.१ लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टम आणि ६४ बीट क्वाडकोअर मीडियाटेकचा प्रोसेसर देखील देण्यात आला आहे. यात २जीबीचे रॅमसोबतच १६ जीबीची इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. याचा रिअर कॅमेरा १३ मेगापिक्सल आणि फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. त्याचबरोबर फिंगरप्रिंट सेन्सॉर, ४जी एलटीई अशा अनेक सुविधा देखील देण्यात आल्या आहेत. याच्या बॅटरीची क्षमता २३००mAh एवढी आहे. हा फोन अॅमझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Leave a Comment