भारत दुग्ध उत्पादनात अव्वल स्थानावर

milk
नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलीद्वारे आर्थिक वर्ष २०१५-१६ साठी संसदेत प्रस्तुत आर्थिक सर्वेक्षणानुसार, भारत दुग्ध उत्पादनात १८.५ टक्के भागीदारीसह जगात अव्वल स्थानावर आहे. वर्ष २०१३-१४ दरम्यान १३.७६९ कोटी टनच्या तुलनेत २०१४-१५ दरम्यान दूधाचे वार्षिक उत्पादन १४.६३ कोटी टन राहिले. यात एकुण ६.२६ टक्केची वाढ नोंदवण्यात आली.सर्वेक्षणानुसार भारतीय कृषि प्रणाली मुख्य रूपाने संमिश्र पिक-पशुधन प्रणाली आहे ज्यात पशुधन भाग रोजगार उपलब्ध करून, पशु व खत तयार करून कृषी उत्पन्न वाढवत आहे.

खाद्य व कृषि संघटनेनुसार (एफएओ) जगात दुग्ध उत्पादनात एकुण ३.१ टक्केची वाढ झाली. वर्ष २०१३ मध्ये ७६.५ कोटी टनच्या तुलनेत वर्ष २०१४ मध्ये हे ७८.९ कोटी टन पोहचले. भारतात दर व्यक्ती दूधाची उपलब्धता १९९०-९१ मध्ये १७६ ग्राम दरदिवसाच्या तुलनेत वर्ष २०१४-१५ दरम्यान ३२२ ग्राम दरदिवस पोहचले. हे वर्ष २०१३ दरम्यान जगाची सरासरी २९४ ग्राम दरदिवसाच्या तुलनेत जास्त आहे. ही वाढत्या लोकसंख्येसाठी दूध आणि दुग्ध उत्पादनाच्या उपलब्धतेत झालेली निरंतर वाढ दाखवते.

ग्रामीण क्षेत्रात कृषीत लावलेल्या कुटुंबाचे लाखो लोकांसाठी डेयरी उत्पन्नाचा एक महत्वपूर्ण सहाय्यक स्त्रोत बनला. डेयरी उद्योगाचे यश दूधाच्या संग्रहाची एकीकृत सहकारी प्रणाली, परिवहन, प्रसंस्करण आणि वितरण, दूधाला उत्पादन व पाउडरमध्ये परिवर्तित करणे, पुरवठाकर्ता आणि ग्राहकांवर मौसमी प्रभावाला किमान करणे, दुध आणि दुग्ध उत्पादनाचे ठोक वितरण, नफ्याचे शेतक-यांसोत वाटप करण्याचा परिणाम आहे. पोल्ट्री क्षेत्रात सरकारचे लक्ष वाणिज्य पोल्ट्री उत्पादन वाढवण्यासाठी उपयुक्त धोरण तयार करण्याच्या व्यतिरिक्त कौटुंबिक पोल्ट्री प्रणालीला बळकट बनवण्यावर आहे.अताच्या वर्षात अंडी व मासे, दोघांच्या उत्पादनात वाढ नोंदवण्यात आली. २०१४.१५ मध्ये अंडी उत्पादन ७८.४८ अब्ज अंडीच्या जवळपास राहिले जेव्हा की कुक्कुट मांस अंदाजे ३०.४ लाख टन राहिले. मत्स्य पालन देशाच्या सर्व घरगुती उत्पादनाचा एक टक्के आहे जेव्हा की कृषि जीडीपीचा ५.०८ टक्के आहे.

२०१४-१५ दरम्यान एकुण मत्स्य उत्पादन १०.१६ मिलियन टन होते. वर्ष २०१५-१६ च्या अंतिम तिमाहीत उत्पादनात वाढची स्थिती पहावयास मिळाली. हे अंदाजे ४७.९ लाख टन (अंतिम) आहे. कृषि क्षेत्रात कृषि आणि गैर-कृषि हालचालीच्या विविधिकरणाच्या संदर्भात कुक्कट पालन आणि पशुधन उत्पादनाची आजीविका सुरक्षा वाढवण्यात खुप महत्व आहे.

Leave a Comment