अॅपल फोन अनलॉक करून एफबीआयच्या मदतीची मॅकेफीची तयारी

maceffi
सॅन बर्नार्डिनो येथील गोळीबार प्रकरणात संशयित असलेल्या सैयद रिझवान याचा आयफोन अनलॉक करण्याचा न्यायालयाचा आदेश अॅपलकडून मान्य न केल्याप्रकरणात अँटी व्हायरस सॉफ्टवेअर निर्माता जॉन मॅकेफीने एफबीआयला या संदर्भात मदत देऊ केली आहे. त्याने त्याच्या टीमच्या सहाय्याने तीन आठवडयांच्या आत या आयफोनचे इन्स्क्रीप्शन तोडून देण्याची तयारी दाखविली असून या मदतीबद्दल कोणताही मोबदला नको असल्याचेही जाहीर केले आहे. विशेष म्हणजे मॅकेफी लिबरेटेरियन पार्टीकडून अमेरिकन राष्ट्रपदाच्या शर्यतीत सामील असून तो त्यासाठी प्रचार करत असतानाच त्याने ही घोषणा केली आहे.

या फोनमधील डेटा मिळणे तपासासाठी एफबीआयला अतिशय महत्त्वाचे ठरले आहे व त्यामुळे या फोनचे इन्स्क्रीप्शन अॅपलने तोडून द्यावे असा आदेश न्यायालयाने अॅपलला दिला होता मात्र अॅपलने तो ग्राहकांच्या सुरक्षेला धोका असल्याने मान्य केलेला नाही. त्यावरून सध्या अमेरिकेत नव्याच वादाला तोंड फुटले आहे. अॅपलचा सीईओ कुक याने या प्रकरणी अमेरिकी सरकारने मध्यस्ती करावी असे आवाहन केले आहे. फोन अनलॉक न करण्याच्या अॅपलच्या निर्णयाबद्दल गुगलचे सुंदर पिचाई, व्हिसल ब्लोअर एडवर्ड स्नोडेन यांनी टीम कुकची प्रशंसा केली आहे तर उमेदवार ट्रॅफ यांनी अमेरिकन नागरिकांना अॅपलवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Comment