‘ठाकरे’ कुटुंबियांनी खेकडयांना दिली नवी ओळख

crab
मुंबई : ठाकरे या शब्दाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा प्रभाव आहे. आता निसर्गातही आपले नाव ठाकरे घराण्याने कोरले असे म्हटले तर वावग ठरणार नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजसने खेकड्याची एक नवी प्रजाती शोधून काढली आहे. तेजससह दोन संशोधकांनी यासंदर्भात एक शोधनिबंध सादर केला असून नव्‍या प्रजातींपैकी एका जातीला ‘ठाकरे’ असे नाव देण्यात आले आहे. तशी माहिती त्याने फेसबूकवर टाकली आहे.

निसर्गाची आवड असणारा १९ वर्षांचा तेजस सापाची एक दुर्मिळ प्रजाती शोधण्यासाठी कोकणातल्या सावंतवाडीला गेला होता. पण, सापाचा शोध घेता घेता त्याच्या नजरेला एक वेगळ्याच प्रजातीचा खेकडा दिसला. लाल रंगाचे कवच असणारा आणि पिवळ्या रंगाच्या नांगी असणारा हा खेकडा होता.
crab1
तेजसने या प्रजातीचा शोध लावल्याने त्याला या प्रजातीच्या खेकड्याचे नामकरण करण्याचा अधिकार मिळाला. ‘गुबरनॅटोरियाना रुबरा’ असे नाव त्याने सुरुवातीस सुचवले. पण, नंतर त्याचे मार्गदर्शक आणि झूऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे एस के पती यांनी मात्र त्या खेकड्याचे नामकरण ‘गुबरनॅटोरियाना ठाकरेयी’ असे केले. ज्याने खेकड्याचा शोध लावला त्याचे नाव या खेकड्याच्या प्रजातीला दिले जावे म्हणूनच त्यांनी असे केल्याचे तेजसने म्हटले आहे.

या गटाने सह्याद्रीच्या घाटांमध्ये गोड्या पाण्यातील खेकड्यांच्या एकूण पाच नवीन प्रजातींचा शोध लावला आहे. या प्रजातींची माहिती ‘झूटाक्सा’ या आंतरराष्ट्रीय प्राणीशास्त्रीय नियतकालिकात प्रकाशित करण्यात आली आहे. आदित्य ठाकरेंनी फेसबूकवरही यासंबंधीची पोस्ट शेअर केली आहे.

1 thought on “‘ठाकरे’ कुटुंबियांनी खेकडयांना दिली नवी ओळख”

Leave a Comment