३ मार्चला लॉन्च होणार होंडाची अमेज़ फेसलिफ्ट

amaze
नवी दिल्ली – होंडा कंपनीने आपल्या बहुप्रतिक्षित अमेज़ फेसलिफ्टच्या लाँचिंगची मुहूर्तमेढ रोवली असून हि गाडी येत्या ३ मार्चला लॉन्च करणार असल्याची घोषणा कंपनीने केली आहे. फेसलिफ्टच्या नव्या आवृतीत अनेक बदल करण्यात आले आहेत. ज्यात डिजाईन, स्टाईल आणि फिचर्सचा समावेश केला असला तरी गाडीत कोणताही मॅकेनिकल बदल करण्यात आलेला नाही. कंपनीच्या म्हणण्यानुसार या कारचे इंजिन सर्वोत्तम मायलेज देण्यासाठी ट्यून करण्यात आले आहे. होंडा अमेज़ १.२-लीटर आय-व्हीटेक (i-VTEC) पेट्रोल इंजिन आणि १.५-लीटर आय-डीटेक (i-DTEC) डीजेल इंजिनच्या पर्यायात उपलब्ध होईल.

कारचे पेट्रोल इंजिन ८७ बीएचपीचे पॉवर आणि १०९Nmचे टॉर्क देईल. त्याचप्रमाणे डीजेल इंजिन ९९ बीएचपीचे पॉवर और २००Nmचे टॉर्क देईल. दोन्ही प्रकारच्या इंजिनमध्ये ५-स्पीड मॅन्यूअल आणि ऑटोमेटिक गिअरबॉक्स ट्रांसमिशन पर्यायात उपलब्ध आहे. डिजाईनच्या बाबतीत नव्या होंडा अमेज़ला सध्याच्या मॉडेल पेक्षा जास्त आक्रमक लुक देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त होंडाच्या या कारमध्ये नवीन हेडलँप आणि नवीन फ्रंट ग्रिल लावण्यात आले आहेत.

Leave a Comment