शेवर्ले क्रूझच्या किंमतीत कपात!

charvolet
मुंबई : ३० जानेवारीला शेवर्ले क्रूझच्या फेसलिफ्टेड व्हर्जन जनरल मोटर्सने लॉन्च केले होते. या कारची किंमत त्यावेळी १४ लाख ६८ हजार ते १७ लाख ८१ हजार रुपयांदरम्यान निश्चित केली होती. पण आता कार लॉन्चिंगच्या एक महिन्याच्या आत कंपनीने क्रूझच्या किंमतीत ८६ हजार रुपयांची कपात केली आहे.

या मॉडेलची विक्री वाढवण्याच्या उद्देशाने शेवर्लेने टॉप मॉडेलची किंमत ८६ हजार रुपये, तर एंट्री लेव्हल मॉडेलची किंमत ७३ हजार रुपयांनी कमी केली आहे. आता दिल्लीतील शोरुममध्ये ही कार १३.९५ लाख ते १६.९५ लाख रुपयांना उपलब्ध आहे. शेवर्ले क्रूझमध्ये २.० लिटर, ४ सिलेंडर डिझेल इंजिन असून जास्तीत जास्त १६६ पीएस क्षमता आणि ३६० एनएमपर्यंत टॉर्क आहे. क्रूझच्या या इंजिनला ६ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स जोडलेले आहेत. शिवाय, गाडीमध्ये ६ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे पर्यायही दिले आहेत. शेवर्ले क्रूझच्या किंमतीत कपात केल्यानंतर आता टोयोटा कोरोला, फॉक्सवॅगन जेटा आणि स्कोडा ऑक्टेव्हिया यांसारख्या कारना स्पर्धा वाढली असल्याची कार बाजारात चर्चा सुरु झाली आहे.

Leave a Comment