मार खाणे या महिलांसाठी सन्मानाचे

maja
जगाच्या पाठीवर विविध तर्हेपचे समाज सुखनैव नांदत आहेत. त्यांच्या विविध परंपराही आहेत आणि त्यातही आदिवासी समाजाच्या परंपरा जरा विचित्र म्हणाव्या अशाही आहेत. सर्वसामान्यपणे महिलांना मारहाण केली जाणे हा क्रूरतेचा व महिलांच्या आत्मसन्मानाला ठेच लावणारा प्रकार समजला जातो. मात्र इथिओपियातील हमर आदिवासी समाजातील महिलांना मार खाणे हा सन्मान वाटतो. हा समाजही नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या समाजात कॅटल जंपिंग नावाचा एक उत्सव असतो. यात १५ गाईंना एकत्र उभे केले जाते व त्यावरून तरूणांनी उड्या मारून पलीकडे जायचे असते. यात जो मुलगा यशस्वी होत नाही त्याचे लग्न होत नाहीच पण अन्य महिला त्याला चोपून काढतात. मग या मुलाच्या कुटुंबातील महिलांना अंगातून रक्त येईपर्यंत मारले जाते. ही मारहाण पुरूष गटाकडून केली जाते. या गटाला माजा असे म्हणतात. विशेष म्हणजे ही मारहाण होत असताना महिला पळून जात नाहीत तर एखादीला मार मिळाला नाही तर ती मारायला सांगते. हा प्रकार महिलांना दोन मुले होईपर्यंत सुरू राहतो.

या महिलांचा असा समज आहे की मार खाल्याने हिंम्मत वाढते व महिला अधिक खंबीरपणे कुटुंबाचे पालनपोषण करू शकतात.

Leave a Comment