सिंहस्थासाठी १२१ फुटांची उदबत्ती बडोद्याहून रवाना

icense
उज्जैन येथे होत असलेल्या सिंहस्थासाठी बडोद्यातील युवकांनी तयार केलेली १२१ फूटांची महाकाय अगरबत्ती उज्जैनकडे रवाना केली गेली आहे. या अगरबत्तीचे वजन ४ टन असून ती ट्राॅलीमधून नॅशनल हायवेने उदयपूर, चितोडगड मार्ग उज्जैनला जात आहे. बुधवारी ही अगरबत्ती नयागांवला पोहोचली तेव्हा इतकी प्रचंड अगरबत्ती पाहण्यासाठी प्रंचड गर्दी झाली होती. या उदबत्तीसाठी २,९५,३५० रूपये खर्च आला आहे. गोपालक विहा भरवाड समाजाच्या सदस्यांनी ही अगरबत्ती तयार केली आहे.

ही अगरबत्ती बनविण्यासाठी गाईचे २१ किलो शेण म्हणजे गोमय, ५०० लिटर गोमूत्र, १८० लिटर दही, १८० लिटर दूध, ५२० किलो गुग्गुळ, ५०० खोबरे वाट्या, ४५ किलो तूप व दोन बांबू असे साहित्य वापरले गेले आहे. कामधेनू महायज्ञाच्या वेळी ही अगरबत्ती पेटविली जाणार आहे.

Leave a Comment