युनायटेड स्पिरिट्सच्या अध्यक्षपदाचा मल्ल्यांना द्यावा लागला राजीनामा

vijay-mallya
बंगळुरू- कर्जाच्या बोजाखाली अनेक वर्षांपासून दबलेल्या विजय मल्ल्या यांना युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियाने विजय मल्ल्यांना डिफॉल्टर किंवा कर्ज बुडवणारे घोषित केले होते. त्यांनी हा राजीनामा दिल्यानंतर त्यांना डिएजिओ पीएलसी यांच्याशी झालेल्या करारानुसार ५१६ कोटी रुपये मिळणार आहेत. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर महेंद्र कुमार शर्मा हे युनायटेड स्पिरिट्सचे नवे चेअरमन झाले आहेत. विजय मल्ल्यांना पहिल्या वर्षी २४० कोटी रुपये मिळतील आणि उरलेली रक्कम अडीच वर्षाच्या काळात मिळणार आहे.

Leave a Comment