महागाईचा भडका; रुपया निचांकी पातळीवर

dollar
नवी दिल्ली – आज डॉलरच्या तुलनेत रुपयाने ३० महिन्यातील निचांकी स्तर गाठला. एका डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्य शुक्रवारी ६८.७८ एवढे होते. रुपयाच्या मुल्यात गेल्या काही महिन्यामध्ये अनेक चढउतार दिसून आले. त्यानंतर काही दिवसांपासून सातत्याने घसरण दिसून आली. महागाई डॉलर वधारल्यामुळे वाढण्याची शक्यता आहे. रुपयाची निचांकी पातळी ६८.८४ आहे. या पातळीपेक्षाही रुपया घसरण्याची चिन्‍हे आहेत.

रुपया घसरल्यामुळे सर्वप्रथम पेट्रोलियम पदार्थांवर परिणाम होणार आहे. कच्च्या तेलाची किंमत कमी असली तरीही रुपया ६८च्या पातळीखाली गेल्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर वाढू शकतात. डाळी तसेच खाद्य तेलाच्या किंमतीही भडकण्याची शक्यता आहे. देशात डाळीच्या किंमती अद्यापही वाढलेल्याच आहे. त्यात आणखी वाढ होण्‍याची भीती आहे. याशिवाय इलेक्ट्रोनिक्स वस्तूही महाग होऊ शकतात. तसेच कार उद्योगालाही फटका बसू शकतो. याशिवाय परदेशात फिरायला जाणेही महाग होऊ शकते.

तज्ञांच्या मते, रुपया आणखी घसरण्याची चिन्हे आहेत. आतापर्यंतची निचांकी पातळी ६८.८४ आहे. सध्या रुपया या पातळीजवळ पोहोचला आहे. त्यात आणखी घसरण होऊन ६९ पर्यंतही रुपया घसरु शकतो. चीन कोणत्याही क्षणी युआन या चलनाचे अवमुल्यन करु शकतो. तसे झाल्यास रुपया आणखी घसरण्याचा धोका आहे.

Leave a Comment