उत्तरप्रदेशातील अवलियाने बनवली लाकडाची ‘वूडन बाईक’

bike
मुजफ्फरनगर – आजवर लोखंड, पोलाद, किंवा अगदी सोन्याच्या पत्र्यापासून बनलेल्या बाईक तुम्ही पाहिल्या असतील किंवा बघितल्या असतील. पण आमचा दावा आहे की, तुम्ही लाकडापासून बनलेली बाईक नक्कीच पाहिली नसणार. पण जर का यापूढे तुम्हाला लाकडाची बाईक रस्त्यावर दिसली तर आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण, लाकडापासून बाईक बणविण्याची किमया उत्तरप्रदेशातील एका अवलियाने साधली आहे.

या अवलीयाचे राज शांतनू असे नाव असून त्याने लाकडापासून बाईक बणवली आहे. तो उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथील राहणारा असून, त्याने बनवलेली वूडन बाईक पहाल तर तुम्ही देखील आश्चर्यचकीत व्हाल. या बाईकचे फिचर्सही जबरदस्त आहेत.

संपूर्णतः लाकडाची असलेल्या या बाईकचे नाव ‘वूडी पॅशन’ असे ठेवण्यात आले आहे. ही बाईक १८० सीसीची असून, ही अनोखी बाईक प्रति एक लिटर पेट्रोलमध्ये १५ किलोमीटर इतके अंतर कापते. या बाईकवर दोन व्यक्ती आरामात बसू शकतात. इतर बाईकच्या तुलनेत या बाईकची सीट ८.५ फूट इतकी लांब आहे. गरम झालेले इंजिन थंड ठेवण्यासाठी या बाईकमध्ये एक रेडियेटरही लावण्यात आले आहे. तसेच, या बाईकसाठी रेडियल टायरही वापरण्यात आले आहेत.

या बाईकचा निर्माता राहिलेला शांतनू हा बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमचा प्रचंड मोठा फॅन असून, नवकल्पनेतून बणविलेली ही बाईक तो जॉनला भेट देणार आहे. ही बाईक दिसायला अगदी घोस्ट राईडसारखी आहे. या गाडीची हेडलाईट हवी तशी कंट्रोलही करता येते. विशेष म्हणजे या बाईकला शॉकॉप्सर नाहीत. कारण बाईकला बसविण्यात आलेले रेडियल टायर बाईक सस्पेंशनचे काम करतात. ही बाईक बणविण्यासाठी २.५ लाख रूपये खर्च तर तिन महिने इतका कालावधी लागला. ही गाडी खरेदी करण्यासाठी सध्या अनेकजन उत्सूक असून, आतापर्यंत या गाडीसाठी ३ लाख २० हजार रूपये तकी बोली लागली आहे.

Leave a Comment