आता फेसबुकच्या नव्या फिचरमधून द्या हव्या त्या रिअ‍ॅक्शन

emoji
मुंबई: आपल्या युजर्ससाटी सतत काहीतरी नवनवीन फिचर्स फेसबुक हे घेऊन येते. फेसबुकने आता प्रॉमिस केल्यानुसार त्यांनी इमोजीद्वारे रिअ‍ॅक्शन देणारे एक नवे फिचर्स आणले आहे. लाईक, लव्ह, हाहा, वॉव, सॅड किंवा अ‍ॅंग्री असे इमोजी आहेत. ज्याद्वारे आता तुम्ही तुम्हाला हवी तशी रिअ‍ॅक्शन देऊन शकता.

तुम्हाला फक्त लाईक बटन प्रेस करून(मोबाईलसाठी) हे इमोजी वापरण्यासाठी होल्ड करायचे आहे. त्यानंतर बाकीचे इमोजी तुम्हाला स्क्रिनवर दिसतील. हे रिअ‍ॅक्शन फेसबुकवर यशस्वीपणे लॉन्च करण्यासाठी फेसबुकला साधारण एक वर्ष लागल्याचे सांगण्यात येत आहे. आता हे फिचर्स युजर्स कसे वापरतात याचे फेसबुकडून निरीक्षण केले जाणार आहे. या इमोजींच्या माध्यमातून तुम्ही तुमचे त्यावेळचे हवे ते रिअ‍ॅक्शन देऊ शकता.

आयर्लंड, स्पेन, चिली, फिलीपिन्स, पोर्तुगल, कोलंबिया आणि जपान येथे रिअ‍ॅक्शन इमोजी हे सुरूवातीला टेस्ट करण्यात आले होते. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, ‘लव्ह’हे सर्वात जास्त वापरले जाणारे रिअ‍ॅक्शन आहे. काही देशांमध्ये हे इमोजी आता वापरले जात असून भारतात लवकरच हे नवे इमोजी युजर्सना वापरता येतील.

Leave a Comment