बिजिंग बनली अब्जाधीशांची राजधानी

bijing
बिग अॅपल या नावाने ओळख असलेल्या अमेरिकेच्या आर्थिक राजधानी न्यूयार्कला मागे टाकत चीनची राजधानी बिजिंग ही अब्जाधीशांची राजधानी बनली आहे. न्यूयार्कमध्ये ९५ अब्जाधीश आहेत तर बिजिंगमध्ये अब्जाधीशांची संख्या १०० वर गेली आहे. शांघाय मासिक हुरून यांनी ही आकडेवारी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे शेअरबाजारातील घसरण व आर्थिक मंदीवर मात करत चिनी लोकांनी संपत्ती जमा करण्यात यश मिळविले आहे.

बिजिंगमधील अब्जाधीशांच्या संख्येत गतवर्षात ३२ जणांची भर पडली असून न्यूयॉर्कमध्ये मात्र केवळ चार नवे अब्जाधीश या यादीत सामील झाले आहेत. हुरूनकडून दर वर्षी या संदर्भातला अहवाल सादर केला जातो. अब्जाधीशांच्या यादीत रशियाची राजधानी मास्को ६६ अब्जाधीशसह तीन नंबरवर आहे. तर चार व पाच नंबरवर अनुक्रमे हाँगकाँग व शांघाय आहेत.

Leave a Comment