कीबोर्डवरील एफ आणि जे की आहेत वेगळ्या

keyboard
तुम्ही डेस्कटॉप किंवा लॅपटाँप वापरत असाल तर टायपिंग करताना एक गोष्ट तुमच्या ध्यानात आली आहे का? की बोर्डवरील एफ व जे या अक्षरांसाठी वापरल्या जाणार्‍या कीज बाकी कीज पेक्षा थोड्या वेगळ्या आहेत. म्हणजे या कीच्या खालच्या भाग थोडा उंच केला गेला आहे. अर्थात हा कांही गमतीचा किंवा योगायोगाचा भाग नाही तर तसे करण्यामागे खास कारण आहे. विशेष म्हणजे हा उंचवटा देण्याचा शोध लावणार्‍या जून ई बॉईश या फ्लोरिडातील महिलेने एप्रिल २००२ साली या शोधाचे पेटंटही घेतलेले आहे.

या दोन की खालच्या बाजूला थोडया उंच केल्यामुळे टायपिंग करताना की बोर्डकडे न पाहताही वेगाने टायपिंग करणे शक्य होते. याचे कारण असे की डाव्या हाताची तर्जनी जेव्हा एफ की वर येते तेव्हा बाकीची बोटे आपोआपच ए,एस व डी अक्षरांवर येतात. त्याचप्रमाणे उजव्या हाताची तर्जनी जेव्हा जे वर टेकते तेव्हा बाकीची बोटे के,एल व कोलनवर येतात. दोन्ही अंगठ्यांच्या मधे स्पेसबार येतो. या पद्धतीने बोटे ठेवली गेली तर सर्व कीज पर्यंत टायपिस्ट सहज रितीने पोहोचतो व या दोन कीवर ऊंचवटा असल्याने आपली बोटे बरोबर कीवर आहेत वा नाही हे न पाहताही टायपिस्टला समजू शकते.

Leave a Comment