अजब रेल्वेच्या गजब कथा

railway
दिल्ली- भारतीय रेल्वेचा २०१६-१७ साठीचा अर्थसंकल्प आज संसदेत सादर होत आहे. आपली भारतीय रेल्वे अनेक बाबतीत अजब आहे व तिच्या कांही गजब कथा आपल्यालाही आवडतील. त्यातील कांही खालीलप्रमाणे

रेल्वे लाईनवरचे नवापूर हे नंदूरबार जिल्ह्यातील स्टेशन चक्क दोन राज्यात विभागले गेले आहे. या स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर महाराष्ट्र व गुजराथ अशा दोन्ही राज्यसीमांचे बोर्ड आहेत. म्हणजे येथे उतरणार्‍या प्रवाशाचा एक पाय महाराष्ट्रात तर दुसरा गुजराथेत पडू शकतो. महाराष्ट्रात भारतातील सर्वाधिक कमी अंतराची रेल्वे नागपूर ते अजनी या गावांदरम्यान धावते. हे अंतर आहे अवघे ३ किमी.

देशात रेल्वेची ७५०० स्टेशन्स आहेत आणि पहिली रेल्वे १८५३ साली मुंबई ते ठाणे या मार्गावर धावली. ही प्रवासी रेल्वे होती. रेल्वे सुरू झाल्यानंतर ५० वर्षे रेल्वेत टॉयलेटची सुविधा नव्हती. १९९७ सालापासून तत्काळ तिकीट सेवा सुरू झाली तर २००५ पासून ई तिकीट सुविधा सुरू झाली. रेल्वेतील कर्मचार्‍यांची संख्या आहे १६ लाख व रेल्वे ही जगातील सर्वाधिक जॉब देणारी ९ नंबरची कंपनी आहे. रेल्वेचा सिंबॉल भोलू नावाचा हत्ती आहे.

1 thought on “अजब रेल्वेच्या गजब कथा”

Leave a Comment