व्हिक्टरीची नवी ऑक्टेन क्रूझर जगासमोर आली

cruser
अमेरिकन कंपनी व्हिक्टरीची आक्टेन क्रूझर बाईक प्रथमच जगासमोर सादर केली गेली आहे. ऑक्टेन २०१७ ही जबरदस्त क्रूझर बाईक असल्याचा कंपनीचा दावा असून तिचे डिझाईन सातव्या वा आठव्या दशकातल्या बाईकशी साध्यर्म्य असणारे आहे. विशेष म्हणजे हेच या बाईकचे वैशिष्ठ्य ठरले आहे. ही बाईक म्हणजे मॉडर्न व ट्रॅडिशनल बाईक डिझाईनचे परफेक्ट मिश्रण आहे.

या बाईकला ११८९ सीसीचे इंजिन, १२.९ लिटरची इंधन टाकी, सिक्स स्पीड गिअरबॉक्स, दिला गेला असून तिचे वजन आहे २४० किलो. अमेरिकेत तिची किंमत ७.२ लाख रूपये असून भारतात ही बाईक कधी लाँच होणार याची माहिती अद्यापी दिली गेलेली नाही.