ई-कॉमर्स ऍप्लिकेशनला जोडणार पेटीएम

paytm
नवी दिल्ली – लवकरच आपले वॉलेट ऍप्लिकेशन ऑनलाइन पेमेंट कंपनी ‘पेटीएम’ बंद करणार असून वॉलेट ऍप्लिकेशनला बंद करून कंपनी ई-कॉमर्स ऍप्लिकेशनला जोडणार आहे. पेटीएम याचबरोबर भारतात पहिल्यांदाच ‘सुपर ऍप’ घेऊन येणार आहे.

सर्व बँकिंगच्या सेवा वापरण्यासाठी चीनमधील ग्राहक एकाच ऍप्लिकेशनचा वापर करतात. तेथे प्रत्येक ऍप्लिकेशन हे सुपर ऍप असते. चीनमधील वीचॅट, अलिपे आणि टॅबो ही सुपर ऍप्लिकेशन आहेत, पेटीएमचे संस्थापक आणि सीईओ विजय शेखर शर्मा यांनी सांगितले. पेटीएम आणि वॉलेट दोन्ही एकमेकांना पुरक आहेत. वॉलेट ऍप्लिकेशन मोबाईलमध्ये ठेऊन त्याचा काहीही उपयोग नाही. पेटीएमचे मुख्य ऍप्लिकेशन सुरू राहणार आहे. कंपनीच्या मुख्य ऍप्लिकेशनमध्ये बदल करण्यात येत असून हे सुपर ऍप असणार आहे. कंपनीकडून ग्राहकांना दोन ऍप्लिकेशन देण्याऐवजी दोन्ही ऍप्लिकेशनमधील सेवा सुपर ऍपमध्ये असणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पेटीएमचे सुपर ऍप मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात अधिकृतपणे सादर करण्यात येणार आहे. पेटीएम बँक सुरू करण्यासाठी उशीर का होत आहे, असे विचारले असता, आपला बाजारामध्ये सर्वोत्तम उत्पादन आणण्याचा प्रयत्न आहे. आपल्या कंपनीकडून योग्य वेळी योग्य उत्पादने बाजारात आणण्यात आली आहेत. या वर्षीच्या जून महिन्यात कंपनीची बँक बाजारात सेवा देण्यासाठी येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कंपनीकडून एप्रिल महिन्यात बँकिंग सेवा देण्याचा प्रयत्न होता. मात्र काही कारणास्तव आता ही सेवा जूनपासून सुरू होणार आहे.

Leave a Comment