पतंजलीला सरकार देणार ५४७ एकर जमीन

ramdev-baba
नागपूर – राज्य सरकारने योगगुरु रामदेवबाबा यांच्या पतंजली ट्रस्टला विदर्भात विविध औद्योगिक प्रकल्प उभारण्यासाठी ५४७ एकर जमीन हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला असून विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये आयुर्वेदिक औषधी उत्पादन व संत्रा प्रक्रिया प्रकल्प पतंजलीतर्फे उभारण्यात येणार आहे. तसेच प्रदेशात मेगा फूड पार्क उभारण्याचा पतंजलीचा मानस आहे.

याविषयी माहिती देताना केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले, पतंजली ट्रस्टला ‘मिहान‘ प्रकल्पात ५४७ एकर जागा देण्यात येईल. त्यापैकी काहीतरी १०८ एकर जागा ही स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये (एसईएझेड) आहे. तर उर्वरित २३९ एकर बाहेर आहे. यामुळे येथे सुमारे १०००० स्थानिक रोजगार निर्माण होतील. तसेच काटोल एमआयडीसीमध्ये संत्रा प्रक्रिया प्रकल्पासाठी २०० एकर जागा देण्यात येणार आहे. हि जागा येत्या महिनाभरात उपलब्ध करुन दिली जाईल व आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील, असेही ते म्हणाले. शिवाय, मेगा फूड पार्कसाठी पतंजली ट्रस्टला अमरावती येथे जमीन उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

Leave a Comment