खिडकीची काच बनणार टिव्ही स्क्रीन

khidki
हॉलची अथवा आपल्याला सोयीची असलेली घरातील कोणत्याही खिडकीची काच टिव्ही स्क्रीन बनू शकेल असे तंत्रज्ञान संशोधकांनी विकसित केले आहे. खिडकीची ही काच केवळ टिव्ही स्क्रीनच बनेल असे नाही तर ती थर्मोस्टॅटचे कामही करेल. म्हणजे उन्हाळ्यात बाहेरील उष्णता आत येऊ देणार नाही तर थंडीत आतील उष्णता बाहेर जाऊ देणार नाही.

युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटीश कोलंबिया या कॅनडातील विद्यापीठातील संशोधक केनेथ चॉ यांनी त्यांच्या टीमसह अशी काच तयार केली आहे. ते म्हणाले, काचेच्या छोट्या तुकड्यावर चांदीसारख्या धातूचा पातळ थर दिला तर काचेवरून प्रकाशाचे परिवर्तन अधिक प्रमाणात होते. धातू हा वीजवाहकही आहे. त्यामुळे घरातील खिडक्यांवर अशा अॅडव्हान्स टेक्नॉलॉजीने बनविलेल्या काचा बसविल्या तर काचेचा टिव्ही डिस्प्लेसारखा उपयोग करता येतो. याच्या चाचण्या सध्या सुरू आहेत. घरात, कार्यालयात कुठेही अशा काचा वापरता येतील.

Leave a Comment