स्कोडाची सुपर्ब भारतात दाखल

skoda
एक वर्षापूर्वीच आंतरराष्ट्रीय बाजारात लाँच झालेली स्कोडाची सुपर्ब २०१६ ही कार भारतात लाँच झाली आहे. तिची किंमत २२.६८ लाखांपासून पुढे सुरू होत असून ती पेट्रोल व डिझेल अशा दोन्ही व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होणार आहे.

या सुपर्बचे शार्प डिझाईन ग्राहकांना आकर्षून घेण्यात यशस्वी होईल असा कंपनीचा दावा असून ही कार मुख्यत्वे युवा वर्गाला नजरेसमोर ठेवून डिझाईन केली गेली आहे. कारला स्लीक हेडलाईट, ऑटो ट्रान्समिशन सिक्स स्पीड डीएसजी बॉक्स दिले गेले आहे. ही कार फॉक्सवॅगनच्या नव्या एमक्यूबी प्लॅटफॉर्मवर तयार केली गेली असून कारमध्ये अंतर्गत स्पेस प्रशस्त आहे. यामुळे या कारचा प्रवास आरामदायक होतो असा कंपनीचा दावा आहे.