पोलीस भरतीसाठी वयोमर्यादेत वाढ!

police
मुंबई : पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी खुल्या प्रवर्गासाठी आता २५ ऐवजी २८ वयोमर्यादा, तर मागासवर्गीयांसाठी ३० ऐवजी ३३ एवढी वयोमर्यादा करण्यात आली आहे.

विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. रविंद्र कुमार संगल यांनी पोलीस शिपाई भरतीबाबत सुधारित मसुदा जाहीर करताना खुल्या आणि मागासवर्गीयांसाठी वाढलेल्या वयोमर्यादेबाबत माहिती दिली. खुल्या वर्गातील पोलीस भरतीसाठी उमेदवारांची वयोमर्यादा कमीत कमी वय १८ वर्षे, तर जास्तीत जास्त वय २८ वर्षे असणार आहे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी भरतीसाठी वयोमर्यादा कमीत कमी वय १८ वर्षे, तर जास्तीत जास्त वय ३३ वर्षे असणार आहे. पोलीस भरती आधीच सुरु झाली आहे. मात्र, ज्यांनी यापूर्वीच ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत, त्यांनी पुन्हा नव्याने अर्ज दाखल करण्याची गरज नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Comment