फ्रीडमला टक्कर देणार ६ जीबी रॅमचा स्मार्टफोन

vivo
मुंबई – २५१ रूपयांच्या जगातील सर्वात स्वस्त स्मार्ट फोनमुळे भांबाऊन गेल्यानंतर लोकांना आणखी एक गोड धक्का बसणार आहे. तसेच स्मार्टफोनच्या दुनियेत सध्या २ जीबी किंवा ४ जीबी रॅम असलेले स्मार्टफोन लवकरच कालबाह्य होण्याची चिन्हे असून व्हायवो ही चायनीज मोबाईल निर्माता कंपनी ६ जीबीचा स्मार्टफोन बाजारात लवकरच लॉंच करणार आहे.

या नव्या स्मार्टफोनचे नाव ‘एक्स प्ले ५’ असे असल्याचे समजते. हा मोबाईल येत्या १ मार्चला ग्राहकांच्या भेटीला येण्याची शक्यता असून या स्मार्टफोनमध्ये केवळ ६ जीबी रॅमच असणार नाही तर, यात स्नॅपड्रॅगन ८२० प्रोसेसरही असेल. त्यामुळे, इंटरनेट हाताळणे खूप सूलभ होणार आहे. या फोनचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा स्मार्टफोन सौरऊर्जेवरही चार्ज केला जाऊ शकतो. या फोनच्या दोन बाजू गोलाकार असतील असे कंपनीने अगोदरच जाहीर केले होते.

Leave a Comment