प्लूकली टाऊन- मोस्ट हाँटेड प्लेस

pluckley
जगात भूते आहेत व नाहीत हा प्रश्न देव आहे वा नाही इतकाच वादाचा आहे. भूतांचे अस्तित्व मान्य करणार्‍यांची संख्या मोठी आहे तशीच भूते खेते हे थोतांड आहे असे मानणाराही मोठा समुदाय आहे. मात्र ब्रिटनच्या केंट परगण्यातील प्लुकली हे गांव गेली ६० वर्षे ब्रिटनमधील मोस्ट हाँटेड प्लेस म्हणून प्रसिद्धीस आले असून त्याची नोंद गिनीज बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्येही केली गेली आहे.

या गावात किमान १२ ते १६ भूतांचे वास्तव्य असल्याचे सांगितले जाते. बाहेरचे लोक येथे भूतांचा अनुभव घेण्यासाठी येतात. या भूतात पाणी देणारी जिप्सी महिला, रेडी लेडी, हायवे मॅन, कोचमन, कर्नल यांची भूते वारंवार दर्शन देणारी आहेत. जिप्सी महिला पुलाजवळ दिसते ती पूर्वी एका अपघातात ठार झाली होती असे सांगतात. येथे रात्री अपरात्री अचानक घोडा गाडीचे आवाज येतात, भीतीदायक किंकाळ्या ऐकू येतात, जंगलातून चित्रविचित्र आवाज येतात तर येथील सेंट निकोलस चर्चचा दरवाजा ठोठावल्याचे आवाजही येतात. प्रत्यक्षात आवाजांचा शोध घेतला तर कांहीच दिसत नाही.

अर्थात या गावात आजही लोक राहतात व या भूतांमुळे ते कंटाळून गेले असल्याचेही सांगितले जाते.

Leave a Comment