पगानीची सुपरकार हुआयरा बीसी

pagani
पगानीच्या कार्स ही एक वेगळीच दुनिया आहे. एक्स्लुझिव्ह, परफॉर्मन्सला उत्कृष्ट आणि ताकदवार यासाठी गाजलेल्या या गाड्या किंमतीलाही तगड्या म्हणून प्रसिद्ध आहेत. पगानीने नव्या अवतारात सादर केलेली हुआयरा बीसी ही कारही त्याला अपवाद नाही. या कारचे सर्व फिचर्स अतिउत्तम कॅटेगरीतले आहेतच पण ती आणखी एका वैशिष्ठ्याने परिपूर्ण आहे, ते म्हणजे ही कार विकत घेताना अतिश्रीमंतांनाही दोन वेळा विचार करावा लागेल. कंपनीने कारची किंमत जाहीर केलेली नसली तरी तज्ञांच्या मते ही कार २८ लाख डॉलर्स म्हणजे १९ कोटी रूपयांना मिळेल.

या कारच्या नावात सामील करण्यात आलेले बीसी म्हणजे बेनी काईओला. हा बेनी प्रसिद्ध कार संग्राहक होता आणि पगानीच्या कारचा पहिला ग्राहकही. बेनीचा २०१० साली मृत्यू झाला. त्यामुळे हे नवे मॉडेल त्याला समर्पित करण्यात आले आहे. या कारसाठी व्ही १२ एएमजी इंजिन दिले गेले आहे आणि कारचे वजन पूर्वीच्या मॉडेलच्या तुलनेत कमी आहे त्यामुळे ही कार अधिक वेग घेऊ शकते. या कारसाठी एक्स ट्रॅक हा नवा सात स्पीड ऑटोमेटेड मॅन्युअल गिअर बॉक्स दिला गेला आहे. ० ते १०० किमीचा वेग ती ३ सेकंदात घेते. कारची ताकद वाढविण्यासाठी एअरोडायनामिक्स ट्विक्सचा वापर केला गेला आहे.

या कारची फक्त २० युनिट तयार केली जाणार आहेत आणि अशी अफवा आहे की ही सर्व युनिट कार बाजारात येण्यापूर्वीच विकली गेली आहेत.

Leave a Comment