टाटाची झिका नामांतरानंतर बनली टिअॅगो

tiao
टाटा मोटर्सची दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय ऑटो शोमध्ये सादर झालेली नवी हचबॅक झिका आता टिअॅगो नावाने बाजारात विक्रीसाठी येणार आहे. टाटा या कारच्या जागतिक लॉंचिंग संदर्भात गंभीर आहे त्यामुळे लॅटिन अमेरिकेत धुमाकुळ घातलेल्या झिका व्हायरसशी या कारच्या नावाचे साधर्म्य असल्याने कारचे नांव बदलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय टाटा मोटर्सनी घेतला होता. झिका नावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात या कारसाठी अडचणी निर्माण होऊ शकतील अशी भीती तज्ञ व्यक्त करत होते.

कारच्या नव्या नावासाठी कंपनीने कँपेन चालविले होते. त्यानसार टिअॅगो, सिवेर व अॅडोअर या तीन नावांना पसंती दिली गेली होती मात्र त्यातही सर्वाधिक पसंती टिअॅगो या नावाला मिळाल्याचे समजते. झिकाच्या प्रमोशनसाठी स्टार फुटबॉलर लिओनेल मेस्सी बरोबर करार केला गेला आहे. कारला अॅट्रक्टीव्ह फिचर्सही दिली गेली आहेत. ही कार साडेतीन ते पाच लाख रूपयांदरम्यान ग्राहकाला मिळेल व मार्चपूर्वीच ती बाजारात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. टाटाच्या हॉरीझोनेक्स्ट डिझाईन स्ट्रॅटीजी नुसार बनविली गेलेली ही तिसरी कार आहे.

Leave a Comment