जिओनीने आणला दोन व्हॉटसअपवाला फोन

jeeoni
सध्याच्या तरुणाईची भाषा ही फेसबुक आणि व्हॉटसअपच्या माध्यमातूनच व्यक्त होत असताना त्याच्यावरची कोणतीही मर्यादा या पिढीला नको आहे. अशाच प्रामुख्याने युवा पिढीला एकाच फोनमध्ये दोन व्हॉटसअप अकाऊन्ट वापरण्याची सुविधा देणारा हँडसेट जिओनीने सादर केला आहे. बार्सिलोना येथे भरलेल्या मोबाईल काँग्रेस २०१६ मध्ये चिनी कंपनी जिओनीने जगातला पहिला अँड्राईड थ्रीडी टच डिस्प्लेवाला स्मार्टफोन एस आठ सादर केला. या फोनची किंमत ४४९ युरो म्हणजे ३४ हजार रूपयांच्या दरम्यान आहे. मार्च अखेरी तो बाजारात विक्रीसाठी येईल.

यात देण्यात आलेल्या थ्रीडी टच डिस्प्लेमध्ये तीन प्रकार आहेत. टच, टॅप व प्रेस. बोटांच्या दाबानुसार हा फोन संबंधित अॅप फिचर्स ओपन करेल. नुसता टच अॅप सिलेक्ट करेल, टॅप टचमुळे अॅपचे कंटेंट पाहता येतील तर प्रेस मुळे संबंधित अॅप रन होईल. या हँडसेटला फ्लोटिंग विंडो दिली गेली असून एकाच विंडोत दोन वेगळी अॅप दिसू शकणार आहेत. युजर फोन मध्ये वॉटसअॅपसाठी दोन वेगळ्या नंबरचाही वापर करू शकेल. हँडसेटचे मेटल डिझाईन वैशिष्ठपूर्ण आहे. फ्रेम पातळ असल्याने स्क्रीन मोठा दिसतो. होम बटणमध्येच फिंगरप्रिट सेन्सर दिला गेला आहे. हा फोन ड्युअल सिम असून रोझ गोल्ड, सिल्व्हर व गोल्ड रंगात उपलब्ध आहे.

अन्य फिचर्समध्ये ५.५ इंची फुल एचडी डिस्प्ले, ४ जीबी रॅम, ६४ जीबी इंटरनल मेमरी,१६ एमपीचा रियर तर ८ एम.पी चा फ्रंट कॅमेरा, अँड्राईड अॅमिगो ३.२ ओएस यांचा समावेश आहे.

Leave a Comment