आता वापरा ‘अँड्रॉइड’ ‘डेस्कटॉप’वरही ‘रिमिक्स’ द्वारे

Remix
आतापर्यंत केवळ मोबाईलवर उपलब्ध असलेली ‘रिमिक्स ऑपरेटींग सिस्टीम’ ही अँड्रॉइड सिस्टीम दि. १ मार्च पासून डेस्कटॉपवर उपलब्ध होणार आहे. ‘जाईड’ने विकसित केलेली ‘रिमिक्स’ ही आता आपल्या कॉम्प्युटरवर मोफत डाऊनलोड करून घेता येणार आहे.

गुगलच्या प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या या सिस्टीमद्वारे मेल पाहणे, मजकूर टाईप करणे, वेबसाईट ब्राऊज करणे अशी प्राथमिक स्वरूपाची कामे करता येणे सध्या शक्य आहे. मात्र ही सिस्टीम अधिक विकसित स्वरूपात पूर्णपणे कार्यान्वित होण्यासाठी त्यात आणखी काही सुधारणा कराव्या लागतील. त्याला किमान ६ महिन्यांचा कालावधी लागेल; असे ‘जाईड’चे संस्थापक डेव्हीड को यांनी स्पष्ट केले. त्यानंतर या सिस्टीममध्ये इतर अनेक प्रकारच्या सुविधा देणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.

ही सिस्टीम गूगल प्ले आणि प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करण्यासाठी गूगलची संमती मिळविण्याचे प्रयत्न सुरू असून सध्या ही सिस्टीम कंपनीच्या वेबसाईटवरून डाऊनलोड करावी लागत असल्याने वापरकर्त्यांसाठी ते काहीसे कठीण होत आहे. मात्र गूगलच्या संमतीने लवकरच गूगल प्ले आणि प्ले स्टोअरमध्ये उपलब्ध होईल; असा विश्वास कंपनीच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

Leave a Comment