कारच्या चावीची जागा घेणार स्मार्टफोन

volvo
नवी दिल्ली – जवळपास प्रत्येक क्षेत्रात स्मार्टफोन्समुळे बदल घडवून आले आहेत. जीवनशैलीही वेगवेगळ्या अॅप्समुळे बदलून गेली आहे. लवकरच आता हाच स्मार्टफोन आणखी एक मोठा बदल घडविणार आहे. हा बदल कारमध्ये होणार आहे.

कार चालू करण्‍यासाठी चावीची गरज असते. काही गाड्यांमध्ये पुश बटन सुविधा असते. मात्र, नव्या तंत्रज्ञानानुसार, कारचे इंजिन सुरु करण्‍यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष स्पर्श करण्याची गरज राहणार नाही. एका अॅपद्वारे कारचे इंजिन चालू किंवा बंद करता येणार आहे. यासाठी ब्‍लुटूथ तंत्रज्ञानचा वापर केला जाणार आहे. स्वीडनची आघाडीची मोटार वाहन उत्पादक कंपनी व्हॉल्वोने यावर आधारीत तंत्रज्ञानाची चाचणी घेणे सुरु केले आहे.

अॅपमध्ये एकप्रकारची डिजिटल चावी असेल. या अॅपचे वैशिट्य म्हणजे, एकापेक्षा जास्त व्हॉल्वो वाहनांच्या डिजिटल चाव्या कार्यान्वित करणे शक्य होणार आहे. याशिवाय इतरही काही सुविधा अॅपमार्फत मिळतील. हे तंत्रज्ञान पुढील वर्षापर्यंत प्रत्यक्ष वापरण्यास सुरुवात होईल, अशी कंपनीला अपेक्षा आहे.

Leave a Comment