हृदयविकार टाळण्यासाठी सोपे उपाय

heart-attack
सध्याच्या काळात निर्माण झालेले जीवनशैलीशी संबंधित असलेले विकार कमी करायचे असतील तर जीवनशैली बदलावी लागते. अर्थात याला काही पर्याय नाही. कारण आजारांचे कारण जीवनशैली हेच आहे. म्हणूनच जीवनशैली बदलण्याशिवाय काही पर्याय नाही असे सांगितले जाते आणि ते शक्य नसल्याचे लोकही बोलतात. जीवनशैली ही अनेक गोष्टींशी निगडित असते. विशेषतः खाणेपिणे आणि वागणे यांना जीवनशैलीत महत्त्व असते. मनोकायिक विकार टाळण्यासाठी खाणेपिणे आणि वागण्याच्या सवयी बदलण्याचा सल्ला दिला तर ते अवघड असल्याचे लक्षात येते. मात्र आता तज्ञांनी जीवनशैलीतले काही सोपे बदल सूचित करायला सुरूवात केली आहे.

रोज रात्री साधारण सात ते आठ तास झोप आणि किमान ३० ते ६० मिनिटे व्यायाम या गोष्टींमुळे आरोग्याचे अनेक प्रश्ना सुटू शकतात असे तज्ञांचे म्हणणे आहे. अमेरिकेमध्ये २ लाखांपेक्षाही अधिक लोकांना याबाबत प्रश्नल विचारण्यात आले होते. त्यांच्याकडून आलेल्या उत्तरांचे विश्लेटषण केल्यानंतर यातले बहुसंख्य लोक संकटाशी कधीच मुकाबला करत नसल्याचे आढळले. परंतु रात्रीच्या दहाच्या आत झोपून पहाटे सुर्योदयाच्या आधी उठल्यास पुढे होऊ पाहणारे मनोकायिक विकार टाळले जाऊ शकतात.

त्यामुळे सात ते आठ तासांची शांत झोप आणि दररोज ३० ते ६० मिनिटांचा व्यायाम एवढ्या गोष्टी केल्या तरी हृदयविकार आपल्यापासून दूर राहतो. अर्थात या गोष्टी सांगायला सोप्या असल्या तरी प्रत्यक्षात जीवनामध्ये उतरवताना अनेक प्रकारचे अडथळे येतात आणि हे अडथळेच विकारांना बळकट करतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment