‘स्टार्ट अप’ निर्माण करणार ५ हजार रोजगार

Start-ups
मुंबई: ‘स्टार्ट अप’च्या माध्यमातून १३० कंपन्यांमार्फत आगामी वर्षात ४ हजार ७९२ कोटी रुपयांची उभारणी करण्यात येईल आणि त्यातून ५ हजार नवे रोजगार निर्माण होतील; असा विश्वास ‘इनोव्हेन कॅपिटल’च्या सर्वेक्षण अहवालात नमूद करण्यात आला आहे.

व्यवसाय वृद्धीच्या प्रयत्नात असलेल्या ७० कंपन्यांना ‘इनोव्हेन कॅपिटल’च्या मार्फत निधीचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यामध्ये स्नॅपडील, फ्रीचार्ज, मैंत्रा, प्राक्टो, पोर्टीआ, पीपरटॅप, बैजूज, फासोस, कॅपिलरी टेक्नॉलॉजीज, मंथन सिस्टीम्स यांचा समावेश आहे.

आगामी वर्षभरात १३० ‘स्टार्ट अप्स’च्या माध्यमातून ५ हजार रोजगार निर्माण होण्याची आशा व्यक्त करतानाच या नव्या रोजगारांमध्ये महिलांना मोठ्या संधी उपलब्ध होणार असल्याचे ‘इनोव्हेन कॅपिटल’च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. सध्याच्या उभरत्या उद्योग, व्यवसायात इंटरनेट आणि इ कॉमर्स अधिक तेजीत असल्याचे निरीक्षणही अहवालात नोंदविण्यात आले आहे.

Leave a Comment