मार्चमध्ये बाजारात एचटीसी स्मार्टफोनच्या नव्या श्रेणी

htc2
मुंबई – तैवानची मोबाईल उत्पादक कंपनी एचटीसीने आज आपला वन एक्स ९ हा स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोन बरोबरच एचटीसीने डिझायर सिरीजमधील ५३०, ६३० आणि ८२५ यांच्या नव्या श्रेणी देखील लाँच केल्या आहेत. हे फोन मार्च महिन्यात बाजारपेठेत दाखल होतील.

कसा आहे वन एक्स ९ – या स्मार्टफोनमध्ये ५.५ इंचाचा सुपर एलसीडी एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यात अँड्रॉईड ६.० मार्श्मेलो ऑपरेटिंग सिस्टम आणि २.२ Ghzचा ऑक्टा-कोर मीडियाटेक एक्स १० ६४ बीटचा प्रोसेसर देण्यात आला आहे. यात ३जीबीचे रॅम आणि ३२ जीबीची इंटरनल मेमरी देण्यात आली आहे, जी २टीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. याचा रिअर कॅमेरा ८ मेगापिक्सलचा आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. ब्लूटूथ व्ही ४.१, वायफाय, जीपीएस, जी-सेन्सॉर अशा कनेक्टीव्हिटी देखील देण्यात आल्या आहेत.
htc1
कसा आहे डिझायर ५३० – या स्मार्टफोनमध्ये ५ इंचाचा सुपर एलसीडी एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यात अँड्रॉईड ६.० मार्श्मेलो ऑपरेटिंग सिस्टम आणि १.१ Ghzचा क्वाड-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन २१० एसओसी क्लॉकचा प्रोसेसर देण्यात आला आहे. यात १.५जीबीचे रॅम आणि १६ जीबीची इंटरनल मेमरी देण्यात आली आहे, जी २टीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. याचा रिअर कॅमेरा ८ मेगापिक्सलचा आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. ब्लूटूथ व्ही ४.१, वायफाय, जीपीएस, जी-सेन्सॉर अशा कनेक्टीव्हिटी देखील देण्यात आल्या आहेत.

कसा आहे डिझायर ६३० – या स्मार्टफोनमध्ये ५ इंचाचा सुपर एलसीडी एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यात अँड्रॉईड ६.० मार्श्मेलो ऑपरेटिंग सिस्टम आणि १.६ Ghzचा क्वाड-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४०० एसओसी क्लॉकचा प्रोसेसर देण्यात आला आहे. यात २ जीबीचे रॅम आणि १६ जीबीची इंटरनल मेमरी देण्यात आली आहे, जी २टीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. याचा रिअर कॅमेरा १३ मेगापिक्सलचा आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. ब्लूटूथ व्ही ४.१, वायफाय, जीपीएस, जी-सेन्सॉर अशा कनेक्टीव्हिटी देखील देण्यात आल्या आहेत. हा फोन सीडीएमए आणि ४जीला सपोर्ट करतो.

कसा आहे डिझायर ८२५ – या स्मार्टफोनमध्ये ५.५ इंचाचा सुपर एलसीडी एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यात अँड्रॉईड ६.० मार्श्मेलो ऑपरेटिंग सिस्टम आणि १.६ Ghzचा क्वाड-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४०० एसओसी क्लॉकचा प्रोसेसर देण्यात आला आहे. यात २ जीबीचे रॅम आणि १६ जीबीची इंटरनल मेमरी देण्यात आली आहे, जी २टीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. याचा रिअर कॅमेरा १३ मेगापिक्सलचा आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. ब्लूटूथ व्ही ४.१, वायफाय, जीपीएस, जी-सेन्सॉर अशा कनेक्टीव्हिटी देखील देण्यात आल्या आहेत. हा फोन ४जीला सपोर्ट करतो.

Leave a Comment