गुरूत्त्वाकर्षण लहरींच्या शोधात कोल्हापूरकर तरुणाचा सहभाग

chinmay
मुंबई : अवघे जग गुरूत्त्वाकर्षण लहरींचा शोध लागल्यानंतर आनंदून गेले. मात्र, जगाच्या आनंदाचे कारण ठरलेल्या गुरूत्त्वाकर्षण लहरींच्या शोधात कोल्हापूरकर तरुणाचाही समावेश आहे. या तरुणाचे नाव चिन्मय कलघटगी असे असून, कोल्हापूरकरांचा उर चिन्मयच्या कामगिरीमुळे अभिमानाने भरून आला आहे.

अमेरिकेतील कार्डिफ युनिव्हर्सिटीत २४ वर्षीय चिन्मय पीएचडी करत आहे. तो मुळचा कोल्हापूरचा असून, कोल्हापुरातील लक्ष्मीनगर परिसरात त्याचे कुटूंबिय राहतात. कोल्हापूरच्याच छत्रपती शाहू विद्यालयातून पूर्ण केले. मात्र, लहानपनापासूनच ग्रह, तारे, यांचे प्रचंड आकर्षण असलेला चिन्मय पूढील शिक्षणासाठी सन २०१० मध्ये चेन्नईला गेला. तेथे त्याने चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूटमध्ये त्याने गुरुत्वाकर्षण लहरींबाबत प्रथामिक संशोधन अभ्यास केला. त्यानंतर मग त्याने थेट अमेरिका गाठून कार्डिफ विद्यापीठात प्रवेश घेतला.

दरम्यान, सुमारे १०० वर्षांपूर्वी जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांनी गुरूत्त्वकर्षणाच्या लहरींबाबत भाकीत केले होते. त्यानंतर जगभरातील संशोधक या लहरींसाठी जंग जंग पछाडत होते. अखेर संशोधकांच्या प्रयत्नांना यश आले. गुरूत्त्वाकर्षण लहरींचा शोध लागला. या लहरींचा शोध घेणाऱ्या टीममध्ये चिन्मयचाही समावेश होता. त्यामुळे संशोधनकार्यात चिन्मयनेही मोलाची भूमिका बजावली. चिन्मयवर सध्या कौतूकाचा वर्षाव होत आहे.

दरम्यान, आपल्या कार्याबद्धल चिन्मयला कोणताही गर्व नाही. तो म्हणतो, कृष्णविवर अर्थात दोन ब्लॅक होलमध्ये काही सेकंदाची धडक होऊन या गुरुत्वाकर्षण लहरी तयार होतात. मात्र या शोधात माझे काम हे खूपच कमी आहे. या संशोधनासाठी शास्त्रज्ञ १९८० पासून झटले आहेत. मी केवळ ३ वर्षांपूर्वीच या क्षेत्रात आलो आहे, असेही तो प्रांजळपणे सांगतो.

Leave a Comment