‘एलजी जी ५’ मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये सादर

LG-G1
नवी दिल्ली: मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये ‘एलजी’ने जी ५ हा नवा स्मार्टफोन सादर केला आहे. मात्र या मॉडेलची बाजारपेठेतील उपलब्धता आणि किंमत या बाबी मात्र अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आल्या आहेत.

कॅमेरा आणि फोनच्या बॅटरीची कार्यक्षमता वाढविणाऱ्या ‘एक्सपांडेबल मोड्यूल’सह हा नवा स्मार्टफोन अनेक उपयुक्त आणि आकर्षक सुविधा प्रदान करणारा असून त्याची बॉडी धातूची बनली आहे. या फोनचा डिस्प्ले ५.३ इंचाचा असून त्याची क्षमता ११४० बाय २५६० पिक्सल आहे. ऑलवेज ऑन डिस्प्ले तंत्रज्ञानामुळे फोनच्या स्क्रीनला स्पर्श न करताही वेळ, तारीख आणि बॅटरीच्या चार्जिंगची परिस्थिती याबाबत माहिती मिळू शकते.

‘क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८२०’ प्रोसेसरमुळे या फोनच्या क्षमतेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. या फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ३२ जीबी अंतर्गत स्टोअरेज क्षमता आहे. फोनचा रेअर कॅमेरा १६ आणि ८ मेगापिक्सल क्षमतेचा असून त्यात ७८ आणि १३५ डिग्री वाईड अँगलची लेन्स आहे. त्यामुळे व्यापक लँडस्केप आणि उंच इमारतीची छायाचित्र घेणे सुलभ असल्याचा कंपनीचा दावा आहे. ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही या फोनमध्ये देण्यात आला आहे. या फोनमध्ये २८०० एमएएच क्षमतेची बॅटरी आहे.

एलजी जी ५ मध्ये ४ जी एलटीई, टाइप-सी यूएसबी, एनएफसी, ब्लूटूथ ४.२ आणि वाय फाय ८०२.११ ए/बी/जी/एन/एसी अशा कनेक्टिविटी सुविधा उपलब्ध आहेत. हा फोन अँड्रॉइड ६.० मार्शमेल वर चालतो. सिल्वर, गोल्ड, पिंक और टायटन रंगात हा फोन उपलब्ध असणार आहे.

Leave a Comment