जगातील अर्धी लोकसंख्या होणार अंध!

myopio
सिडनी: जगाची अर्धी लोकसंख्या २०५० सालापर्यंत मायोपिया आजाराने पीडित असतील अशी चिंताजनक माहिती एका संशोधनपर अहवालातून समोर आली आहे. ‘ऑपथॅल्मोलॉजी’ या मासिकात हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.

मायोपिया हा डोळ्यांचा आजार असून डोळ्यांची दृष्टी हा आजार झाल्यास कमी होते. लांबचे अंधूक दिसायला सुरुवात होते. आजार अधिक वाढल्यास दृष्टी गमावण्याचीही शक्यता वाढते.

२००० साली अमेरिकेत मायोपिया आजारामुळे त्रस्त असणाऱ्यांची संख्या जवळपास ९० लाख एवढी होती. मात्र, तीच संख्या २०५० सालापर्यंत केवळ अमेरिकेत २६ कोटींवर जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर कॅनडामध्ये २००० साली ११ लाख असलेल्या मायोपियाग्रस्तांची संख्या २०५० पर्यंत ६६ लाखांवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या आजाराला पर्यावरणातील वाढता प्रदूषण आणि बदलती जीवनशैली कारणीभूत असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. याबाबत ऑस्ट्रेलियातील यूनिव्हर्सिटी ऑफ न्यू साऊथ वेल्सचे प्राध्यापक केव्हिन नायडून यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुम्हाला जर तुमच्या लहानग्यांना या आजारापासून वाचवायचे असेल, तर त्याच्या डोळ्यांची काळजी घ्या. नियमितपणे तपासणी करत राहा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment