मार्च महिन्यात लॉन्च होणार रेनॉल्ट डस्टर फेसलिफ्ट

renault
नवी दिल्ली : दिल्लीतील ऑटो एक्स्पो २०१६ दरम्यान रेनॉल्टच्या डस्टर फेसलिफ्टचा पहिला लूक दाखवण्यात आला होता. पण आता या एसयूव्ही गाडीची प्रतिक्षा आता संपली असून ही गाडी येत्या मार्च महिन्यात लॉन्च केली जाणार आहे.

काही कॉस्मेटिक बदल रेनॉल्ट डस्टर फेसलिफ्टमध्ये करण्यात आले आहेत. त्याशिवाय एसयूव्हीमध्ये ३१ नव्या फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्सचाही समावेश आहे.

२०१२साली पहिल्यांदा रेनॉल्टने डस्टर भारतात लॉन्च केली होती. भारतीय कार बाजारात ऑफ रोड कार म्हणून प्रचंड लोकप्रिय ठरली. दरम्यानच्या काळात रेनॉल्टकडून छोटे-मोठे बदलही करण्यात आले. मात्र, फेसलिफ्ट मॉडेलमध्ये काही नव्या फीचर्सचाही समावेश करण्यात आला आहे.

आधीच्या मॉडेल्सच्या तुलनेत रेनॉल्ट डस्टर फेसलिफ्ट अधिक प्रीमियम दिसून येते. या गाडीत ट्वीन स्लॅट क्रोम ग्रिल, हॉक आय क्लस्टर हेडलँप, ब्लॅक प्लास्टिक क्लॅडिंग यांसोबत नवा फ्रंट बंपर आणि स्किड प्लेटसारख्या नव्या फीचर्सचाही समावेश आहे. त्यासोबतच, ५-स्पोक एलॉय व्हील, इलेक्ट्रिकली एडजेस्टेबल ORVM, नवे साईड स्कर्ट आणि स्पोर्टी लूक फेसलिफ्टची खासियत ठरते. रेनॉल्ट डस्टर फेसलिफ्टमध्ये १.५ लिटर डिझेल आणि १.६ लिटर पेट्रोल इंजिन ऑप्शनसोबत उपलब्ध असेल. डिझेल इंजिनला दोन पद्धतीने ट्युन केले आहे. ज्यामध्ये एक ८४ बीएचपीची क्षमता आणि २००Nmचे टॉर्क देते. रेनॉल्ट डस्टर फेसलिफ्टची बाजारात ह्युंदाई क्रेटा आणि निसान टेरेनो या गाड्यांशी स्पर्धा असणार आहे.

Leave a Comment