कोणत्याही रजिस्ट्रेशनविना एलई १ स्मार्टफोनची विक्री

le-eco
मुंबई: सोशल मिडियावर लेईको या कंपनीच्या स्मार्टफोनची गेल्या काही दिवसांपूर्वी जोरदार चर्चा आहे. अलीकडेच या चीनी कंपनीने आपला नवीन स्मार्टफोन एलई १एस भारतीय बाजारात सादर केला. कंपनीने एकाचवेळी आपले दोन मॉडल एलई १एस आणि एलई मॅक्स लाँच केले होते. सुरूवातीला या स्मार्टफोनचा फ्लॅश सेल ऑनलाईन करण्यात आला. याला ग्राहकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता हा स्मार्टफोन २५ फेब्रुवारीपासून कोणत्याही रजिस्ट्रेशनशिवाय फ्लिपकार्टवर उपलब्ध होईल.

२५ फेब्रुवारीला लेईको डे म्हणून साजरा केला जाणार असून ह्या दिवशी कंपनीचे जवळपास ८ करोड प्रोडक्ट उपलब्ध होतील. ह्या कंपनीला पहिले एलईटीव्ही ह्या नावाने ओळखले जात होते. लेईकोचे १०,९९९ रुपयात मिळणारा एलई १एस स्मार्टफोनला ग्राहकांद्वारे खास पसंत केले गेले आहे. हा स्मार्टफोन सिल्व्हर आणि गोल्ड कलरमध्ये उपलब्ध आहे.

Leave a Comment