बँक खातेदार पुन्हा होणार अंगुठाछाप!

hsbc
लंडन : भविष्यात बँक खाते ऑपरेट करण्यासाठी आयडी किंवा पासवर्डची गरजच उरणार नाही. कारण एचएसबीसी ब्रिटन या बँकेने आता आपल्या खातेदारांसाठी बायोमेट्रिक आणि व्हाईस ट्रेकिंग सेवा सुरू केली आहे. याचा फायदा ग्राहकांना होणार असून, या बँकेत अंगठा आणि आवाजावर आपले खाते ऑपरेट होणार आहे. या पद्धतीची सेवा उपलब्ध करून देणा-या कंपनीच्या मते येत्या दोन-तीन वर्षांत आपल्या खात्याच्या सुरक्षेसाठी आयडी, पासवर्डऐवजी आवाज आणि अंगठ्याचाच वापर सुरू होईल. प्रत्येक बँका याच मार्गाचा अवलंब करू शकतात, असा त्यांचा अंदाज आहे. एचएसबीसी बँकेची ही योजना येत्या दोन-तीन महिन्यांत सुरू होणार आहे. त्यासाठी प्रथम खातेदारांना आपला आवाज रेकॉर्ड करणे आवश्यक आहे.

एवढेच नव्हे, तर फिंगर प्रिंटही रजिस्टर करावी लागेल. आवाज आणि अंगठा आयडी आणि पासवर्डप्रमाणे काम करणार आहे. यातून एक तर ग्राहकांचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे. आवाज आणि अंगठ्याचा वापर वाढल्यास या प्रक्रियेसाठी फक्त १० ते १५ मिनिटेच लागणार आहेत. बँकांसह संवेदनशील संस्थांमध्ये पासवर्ड संबंधी ब-याच तक्रारी येत आहेत. एचएसबीसीने आपल्या सर्वेक्षणाच्या आधारे सांगितले की, लोक आपले पासवर्ड वेळोवेळी बदलत नाहीत. त्यामुळे हॅकिंगचा धोका असतो. पासवर्ड विसरण्याच्या तक्रारीही मोठ्या प्रमाणात आहेत. आयडी आणि पासवर्डऐवजी व्हाईस बायोमेट्रिकचा उपयोग ही योजना पहिल्यांदाच सुरू होत नाही. या अगोदर अडीच वर्षांपूर्वी याचा शोध लागल्यानंतर हळूहळू याचा वापर वाढू लागला आहे. अलिकडे पासवर्डच्या तक्रारी वाढल्याने बँका आणि संवेदनशील ठिकाणाचा याकडे कल वाढत आहे. विशेष म्हणजे सर्व अ‍ॅपल मोबाईल डिव्हाईसमध्ये टच आयडी सुविधा आहेत. त्यामुळे भविष्यात याचा वापर वाढणार आहे.

Leave a Comment