२० लाख गाड्या परत मागवणार टोयोटा

toyota
टोकियो : जगभरातून २०.८७ लाख कार प्रसिद्ध कार उत्पादक कंपनी टोयोटा माघारी (रिकॉल) बोलविणार आहे. टोयोटाच्या आरएव्ही-४ स्पोर्ट्स युटिलिटी वाहन (एसयूव्ही)ला रिकॉल करण्यात येत असून जुलै २००५पासून ऑगस्ट २०१४पर्यंत आणि ऑक्टोबर २००५ते जानेवारी २०१६या दरम्यानच्या कारला कंपनी रिकॉल करत आहे. या कारमध्ये मागील सीटबेल्ट सदोष आढळल्याने क्रॅश आणि अपघात होण्याची शक्यता लक्षात घेता या कार माघारी बोलविण्यात येत आहेत.

एक ई-मेल जारी करून टोयोटाने याची माहिती दिली आहे. काही ठिकाणी कार क्रॅश होण्याच्या घटना समोर आल्या आहेत. याला सीटबेल्ट सदोष असल्याचे कारण देण्यात येत होते. मेटल सीट कुशन प्रेमचा काही भाग सीटमधून बाहेर निघत आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता असून, त्यामुळे जखमी होण्याची शक्यता जास्त आहे, असे कंपनीकडून ई-मेलने कळविले आहे.

Leave a Comment