स्वस्त झाला शाओमीचा रेडमी नोट ३

xiaomi
नवी दिल्ली- १६ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी चीनी मोबाईल उत्पादक कंपनी शाओमी एमआय वीक साजरा करत असून त्यानिमित्ताने कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी शाओमीचा स्मार्टफोन रेडमी नोट ३ ची किंमत ८,४९९ रुपयांहून ७,९९९ रुपयांना उपलब्ध केला आहे.

हा फोन दिसायला आयफोनसारखा असून तसेच यापूर्वीच्या मॉडेल्‍सपेक्षा तांत्रिक बाबीमध्येही सरस आहे. या फोनला संपूर्ण मेटल बॉडी आहे. यात तब्बल ४१०० एमएएच क्षमता असणारी बॅटरी या फोनला मिळाली आहे. त्यामुळे बॅटरी बॅकअपच्या बाबतीत हा फोन सर्व स्मार्टफोन्सला मागे टाकणार आहे.
या फोनमध्ये ऑक्टाकोअर क्वालकोम स्नॅपड्रॅगन ६१६ हा प्रोसेसर आहे. याशिवाय ५ इंचाचा डिस्प्ले, सेल्फीसाठी पाच मेगा पिक्सल कॅमेरा तर रियर कॅमेरा १३ मेगापिक्सल आहे. तसेच १६ जीबी ऑनबोर्ड स्टोरेज कॅपेसिटी आहे, तर एक्सपांडेबल मेमरी १२८ जीबीपर्यंत आहे. रेडमी 3 मध्‍ये अॅण्‍ड्रॉईड 5 लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टिम असणार आहे. आयफोन सारखा दिसणारा फोन १०५ डॉलर्स किंवा साडेसात हजारामध्ये भारतात मिळणार आहे. आणखी एक ठळक वैशिष्‍ट्य म्‍हणजे, हा फोन तीन रंगांमध्ये उपलब्‍ध होईल. यापूर्वीचे मॉडेल्‍स फक्त दोन रंगांमध्ये उपलब्ध होते. त्यामुळे नव्या रंगाचेही आकर्षण राहणार आहे.

Leave a Comment