‘मिनी कूपर’चे ‘कन्व्हर्टेबल व्हर्जन’ मार्चमध्ये भारतात

mini-cooper
मुंबई: ‘बीएमडब्ल्यू मिनिकूपर’चे ‘कन्व्हर्टेबल व्हर्जन’ असलेल्या गाड्या १६ मार्चपासून भारतीय बाजारपेठेत उपलब्ध होणार आहेत. या पूर्वी स्टँडर्ड आणि कूपर एस ही मॉडेल्स भारतात उपलब्ध आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या दिल्ली ऑटो एक्स्पोमध्ये ‘बीएमडब्ल्यू इंडिया’चे अध्यक्ष फिलीप वॉन यांनी या वर्षात भारतात ‘कन्व्हर्टेबल’ आणि ‘क्लबमॅन’ ही मॉडेल्स पदार्पण करतील असे घोषित केले होते. त्यानुसार ‘कन्व्हर्टेबल व्हर्जन’चे आगमन झाले आहे.

नव्या युकेएल प्लॅटफॉर्मवर बांधण्यात आलेली ‘कन्व्हर्टेबल’ ही गाडी तीन दारांची सॉफ्टटॉप असलेली आहे. पेट्रोल आणि डीझेल या दोन्हीवर चालणारी ‘कन्व्हर्टेबल’ मॉडेल्स भारतात उपलब्ध असणार आहेत. पेट्रोलवर चालणाऱ्या गाडीला १.५ लीटरचे ३ सिलेंडर असलेले १३४ बीएचपी क्षमतेचे; तर डिझेलच्या गाडीला १.५ लीटरचे ११४ बीएचपी क्षमतेचे २७० एनएम टॉर्क असलेले इंजिन बसविण्यात आले आहे.

इंजिनद्वारे पुढच्या चाकांना गती असलेल्या या गाडीची किंमत सुमारे ३५ लाख रुपये असणार आहे.

Leave a Comment