ग्राहकांच्या भेटीला जगातला पहिला फ्लेक्झिबल स्मार्टफोन

mobile
टोरंटो : नुकताच ग्राहकांच्या भेटीला अनब्रेकेबल स्क्रीन असलेला स्मार्टफोन आला असून या क्षेत्रातील तज्ञ स्क्रीनच्या बाबतीत असेच काही प्रयोग करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर फोनची स्क्रीन वाकवता येणारा स्मार्टफोन कॅनडातील काही संशोधकांनी लाँच केला आहे. हा जगातला पहिला फ्लेक्झिबल स्मार्टफोन ठरला आहे.

तुम्ही स्क्रीनला टच न करता या स्मार्टफोनवर ऑनलाईन गेम खेळू शकता. त्याचप्रमाणे ऑनलाईन पुस्तकांची पानेही उलटू शकाल. उजवीकडे फोन वाकवल्यास पाने उजवीकडून डावीकडे उलटली जातील. अगदी हातातल्या पुस्तकाला वाकवल्यावर जी क्रिया होते, अगदी तशीच. तुम्ही पाने उलटण्याची ही क्रिया स्क्रीनवर बोट ठेवून अनुभवूही शकता. त्याचप्रमाणे बेन्ड जेस्चर वापरुन अनेक अॅप्स वापरता येतील. रिफ्लेक्स या फोनला एचडी डिस्प्ले असलेला फ्लेक्झिबल ओएलईडी टच स्क्रीन आहे. अँड्रॉईडचे ४.४ (किटकॅट) वर्जन या फोनमध्ये देण्यात आले आहे.

हा स्मार्टफोन कॅनडातील क्वीन्स विद्यापीठातील ह्युमन मीडिया लॅबमधील संशोधकांनीतयार केला असून या फोनचे नाव रिफ्लेक्स असे ठेवण्यात आले आहे. हाय रेजोल्युशन असलेल्या या फोनमध्ये मल्टी टच आणि बेन्ड इन्पुट्सचे एकत्रिकरण करण्यात आले आहे.

Leave a Comment