फेरारीची स्टनिंग ४८८ जीबीटी भारतात आली

ferrari488
फेरारीची आकर्षक कार ४८८ जीबीटी भारतात बुधवारी लाँच करण्यात आली. या कारची किंमत एक्स शो रूम ३ कोटी ८८ लाख रूपये आहे. सर्वात सुंदर व आकर्षक कार म्हणून लोकप्रिय झालेल्या फेरारीच्या ४५८ मॉडेलमध्ये उर्त्सजन नियमांसंदर्भात कांही बदल करावे लागले होते.त्यावेळी कंपनीने या कारची रिप्लेसमेंट म्हणून ४८८ जीबीटी तयार केली होती.

अॅल्युमिनियमचा या कार बांधणीत उपयोग करण्यात आल्याने ती वजनाला पूर्वीच्या तुलनेत हलकी बनल्याचे सांगितले जात आहे. या कारचे वजन १३७० किलो आहे. या कारला ट्विन टर्बो व्ही ८ इंजिन, सात स्पीड ड्युअल क्लच एफ वन डिराईव्हड ट्रान्समिशन दिले गेले आहे. त्यासाठी ई डिफ तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. ० ते १०० किमीच्या वेग घेण्यास या कारला ३ सेकंदे लागतात व तिचा टॉप स्पीड आहे ताशी ३३० किमी. कारला कार्बन सिरॅमिक ब्रेक्स दिले गेले आहेत.

फेरारीची स्पायडरही या वर्षअखेर भारतात दाखल होणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.