‘ट्विटर’वर आणखी एका फिचरची भर

twitter1
नवी दिल्ली : ‘ट्विटर’चा वापर करणा-यांना खुशखबर असून आता ट्विटरवर डायरेक्ट मॅसेजमध्ये व्हिडियो पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची घोषणा ट्विटरने नुकतीच केली आहे. या सुविधेचा आयओएस आणि अँड्रॉईडधारक युझर्सना लाभ घेता येईल. त्याचबरोबर ट्विटर डॉट कॉमवरही डायरेक्ट व्हिडियो पाठवता येईल. मात्र, सध्या व्हिडियो रेकॉर्डिंगची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली नाही. ट्विटरच्या युझर्सची संख्या वाढविण्यासाठी या नवीन फीचरचा पर्याय खुला करण्यात आला आहे. यामाध्यमातून फेसबुक आणि गुगलसारख्या बलाढय़ा प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देण्याचा ट्विटरचा उद्देश आहे.

Leave a Comment