अॅपलचे पहिले डेव्हलपमेंट सेंटर हैदराबादमध्ये होणार

apple
नवी दिल्ली – आपले पहिले डेव्हलपमेंट सेंटर हैदराबादमध्ये सुरू करण्याची घोषणा तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख कंपनी अॅपलने केली आहे. आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी आम्ही भारतात सातत्याने गुंतवणूक करत आहोत, ज्यामुळे आम्ही अधिकाधिक ग्राहकांना जोडू शकू असे कंपनीने आपल्या वक्तव्यात म्हटले आहे.

अॅपलची भारतात आपले रिटेल स्टोअर्स उघडण्याची योजना आहे. नव्या सिंगल ब्रँड रिटेल स्टोअरला भारतात सुरू करण्यासाठी कंपनीला एक नवा अर्ज करावा लागेल. अलिकडेच कंपनीने डीआयपीपीला यासंबंधी एक प्रस्ताव दिला होता, ज्यात काही अडचणी होत्या, यामुळे कंपनीला पुन्हा नव्याने अर्ज करण्यास सांगण्यात आले आहे.

अॅपल सध्या आपली उत्पादने चीन, जर्मनी, अमेरिका आणि फ्रान्सच्या रिटेल स्टोअरद्वारे विकते. भारतात याची उत्पादने रेंडिंगटॉन आणि इन्ग्राम मायक्रो सारख्या वितरकांकडून विकली जातात. जागतिक बाजारात घसरणीनंतरही कंपनी भारतातील आपली गुंतवणूक कमी करणार नाही असे अॅपलचे सीईओ टिम कूक यांनी सांगितले.

Leave a Comment