१ लाखापर्यंतचे विमा कवच फक्त ५०० रुपयांच्या प्रीमियमवर

policy
नवी दिल्ली – सामान्य आरोग्य विमा योजनेची घोषणा केंद्र सरकार येणा-या अर्थसंकल्पामध्ये करण्याची शक्यता आहे. जवळपास ४० कोटी लोकांना या योजनेमुळे स्वस्तातील प्रीमियमवर आरोग्य विमा उपलब्ध होणार आहे. यामध्ये ५०० रुपयाच्या प्रीमियमवर एक लाख रुपयापर्यंतचे विमा संरक्षण मिळणार आहे. तर बीपीएल श्रेणीमध्ये येणा-या लोकांसाठी प्रीमियममध्ये ९० टक्क्यांपर्यंतचे अनुदान देण्यात येणार आहे. खासगी आणि सरकारी क्षेत्राच्या विमा कंपन्या आरोग्य विमा योजना देणार आहेत. आरोग्य विमा सुलभपणे मिळण्यासाठी जनधन खात्याचा वापर करण्यात येणार आहे.

याच्या अगोदर सुरू असणा-या सर्व सरकारी आरोग्य विमा योजना विलीन करून नवीन विमा योजना सुरू करण्यात येईल. नवीन योजनेची व्याप्ती याच्या अगोदर सुरू असणाऱया योजनांपेक्षा जास्त असणार आहे. नवीन योजना यशस्वी करण्यासाठी सरकार राष्ट्रीय आरोग्य संस्थेची स्थापना करणार आहे. सुरुवातीला या योजने अंतर्गत 40 कोटी लोकांना (८ कोटी कुटुंब) या योजनेमध्ये सहभागी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

Leave a Comment