मिनीची क्लबमॅन कार भारतात येणार

cluman
बीएमडब्ल्यू चे अध्यक्ष फिलिफ वॉन सार यांनी त्यांच्या मिनी कंपनीची क्लबमॅन कार भारतात लवकरच दाखल होत असल्याचे जाहीर केले आहे. मिनी कन्व्हर्टिबल आणि मिनी क्लबमॅन या कार त्यांच्या आकर्षक डिझाईनसाठी जगभरात प्रसिद्ध आहेत मात्र आत्तापर्यंत त्या भारतात उपलब्ध नव्हत्या. क्लबमॅन सर्वसाधारण मिनी कारपेक्षा आकाराने थोडी मोठी आहे.

या कारसाठी क्रोमसह वर्तुळाकार हेडलँप दिले गेले असून ही कार पाच सीटर आहे. तसेच या कारला सहा दरवाजे दिले गेले आहे. अंतर्गत भागात बूटस्पेस प्रशस्त आहे शिवाय इंटेरियरमध्ये इंडिगो ब्ल्यू अथवा बुरूंडी रंगापैकी कोणताही रंग ग्राहक निवडू शकणार आहेत. कारला ८.८ इंचाचा ऑप्शनल स्क्रीन नेव्हीगेशन व एव्हीची गरज पूर्ण करण्यासाठी दिला गेला आहे. डॅशबोर्डवर यूएसबी सॉकेट व स्टोरेज कंपार्टमेंट दिले गेले आहे.

ही कार सिक्सस्पीड मॅन्युअल व अॅटोमॅटिक अशा दोन्ही व्हेरिएंटमध्ये येते मात्र भारतात तिचे अॅटोमेटीव्ह व्हर्जनच सादर केले जाणार आहे. कारचे रियर दरवाजे फूट अॅक्टीव्हेटेड मोशन सेंसरने उघडता येतात. ड्रायव्हींगसाठी स्पोर्ट व ग्रीनमोड अशीही निवड करता येते. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सहा एअरबॅग्ज व प्रत्येक सीटला ३ पॉईंट अॅटोमेटीक बेल्ट आहेत. ० ते १०० किमीचा स्पीड घेण्यासाठी या कारला ७ सेकंद लागतात व तिचा टॉप स्पीड आहे ताशी २३० किमी.

Leave a Comment